सारस्वत समाजातील सर्व धार्मिक उत्सव डिसेंबरपर्यंत रद्द: केंद्रीय मठ समिती अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांची माहिती

Religious

सारस्वत समाजाच्या सर्व देवालयांतील, सर्व धार्मिक उत्सव, अन्नसंतपणे डिसेंबर २०२० पर्यंत रद्द करावीत, असा आदेश श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाधीश श्रीमद् विद्याधिराज तीर्थं श्रीपाद वडेर स्वामी महाराजांनी दिला आहे. धार्मिक उत्सव करावयाचेच असल्यास फक्त वैदिकांसहित ५ ते ६ भक्त समूहांपर्यंत सीमित असावे, असे त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.

पर्तगाळ मठाच्या धर्ममंडळाचा हा आदेश सर्वांना बंधनकारक असून त्याचे शिस्तीने पालन करावे असे श्री संस्थानच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेपे यांनी जाहीर केले आहे. दशमीचा पालखी उत्सव देवालयाच्या बाहेरच्या प्रदक्षिणेपुरता सीमित असावा. धर्ममंडळाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्तिक मासांतील वैकुंठ चतुर्दशी व पौर्णिमा हे दोन उत्सव मार्गशीर्ष कृष्ण पक्षांत आचरण करता येतील. आषाढ शुक्ल एकादशीची भजने कार्तिक मासांत आचरण करता येतील. श्रावण मासांतील पुष्प पूजा रह करावी. भाद्रपद मासांतील गणेश चतुर्थी , माघ शुक्ल चतुर्थी या श्री गणेश जयंती दिनी , तसेच अनंत चतुर्दशीचे कार्तिक वा मार्गशीर्ष मासांत आचरण करता येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

याला शाखांत मार्गदर्शन केलेले आहे. कुलदेवस्थानांतील नवरात्री मकरोत्सब रह करावेत. नवरात्रीत यज्ञाराधना व अनुष्ठान फाल्गुन मासांत करतां येते. फक्त वैदिकांकडून जपानुष्ठान तेवढे करावे. वट सावित्री व्रत , नागपंचमी , गौरी तृतीया , उपाकर्म / यज्ञोपवीत धारण विधी , महालय तर्पण , गोकुळाष्टमी , तुलसी विवाह , सरस्वती पूजा , नवरात्र फक्त पूजेपुरतेच मर्यादित असावेत. सरस्वती पूजा व नवरात्र पूजा मकर श्रृंगारून करू नये , सोमवार , शुक्रवार , पंचमी , नवमी , अमावास्या तिथीतील उत्सव देवालयाच्या प्राकारांतही करू नयेत . अन्नसंतर्पण न चालविता फक्त पंचखाद्याचा नैवेद्य वितरण करावा असे त्यांनी कळविले आहे.
धर्ममंडळाच्या सूचनेनुसार देवालयांत सार्वजनिक रित्या धार्मिक उत्सव करावयाचेच असल्यास फक्त वैदिकांसहित ५ ते ६ भक्त समूहांपर्यंत सीमित असावे , पर्तगाळी मठाच्या धर्ममंडळाचा वरील आदेश मठ मंदिरे व कुलदेवालयाच्या सर्व व्यवस्थापन समित्या व सर्व महाजनांस बंधनकारक असून तो आचरणात आणला जावा असे आवाहन करून सर्वांनी मास्क घालावे व सामाजिक अंतर राखावे अशी माहिती केंद्रीय समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेपे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *